चिपळूणला आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मेळावा

रत्नागिरी : बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता चिपळूणच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थांकडील विविध आस्थापना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड करणार आहेत. उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचे ५ बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी रत्नागिरी जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात करावी. नावनोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक (०२३५५-२३७२६४), तसेच प्र.गटनिदेशक आबासाहेब गोरे (8175456597), किशोर नाईक (9822233293) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रीतम शेट्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-09-2024

Shanti 3