नाणीज, साळवी स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ५ संशयितांवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज व शहरातील साळवी स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासाठी बसलेल्या संशयितांवर पोलिसांनी कारवाई केली.

४ डिसेंबर रोजी पोलिसांकडून साळवी स्टॉप व नाणीज येथे छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. नाणीज येथे एका तर साळवी स्टॉप येथे चौघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विलास दिलीप गुरव (३५, रा. नाणीज रत्नागिरी), फिरोज रज्जाक सिंदगीरा (रा. परटवणे रत्नागिरी), शादाब गियास खले (रा. पडवे गुहागर रत्नागिरी), मस्तान महम्मंद हुसेन शेख (२६, रा. क्रांतीनगर रत्नागिरी) व अयुब गुलाब शेख (२५, रा. क्रांतीनगर रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. विलास गुरव हा नाणीज जुना मठ येथे रस्त्याकडेला तर फिरोज सिंदगीरा, शादाब खले, मस्तान शेख, अयुब शेख हे संशयित साळवी स्टॉप येथे आडोशाला दारु पित असल्याचे पोलिसांना आढळून आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 06-12-2024

Amey jwelrs