चांदेराई येथे नदीकिनारी मद्यप्राशन करणाऱ्याविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई येथील नदीकिनारी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. करण्यात आली. धोंडू रत्नू सांडीम (५८, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्याविरोधात सहायक पोलिस फौजदार संजय शिवगण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा गुरुवारी (५ डिसेंबर) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 07-12-2024

Hotel waiter