रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये नाणीज हायस्कूल तालुक्यात तिसरे

पाली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानात नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज या प्रशालेला तालुकास्तरीय गुणांकनामध्ये रत्नागिरी तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. नुकताच रत्नागिरी येथील कै. शामराव पेजे सभागृहामध्ये याचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

शाळेमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य, क्रीडा, स्वच्छता, पर्यावरण यांच्यासंबंधीचे उपक्रम तसेच व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे उपक्रम, शैक्षणिक ध्येय धोरणांची अंमलबजावणी इत्यादी निकषांच्या आधारे हे गुणदान केले गेले.

संस्था अध्यक्ष प्रशांत कदम, उपाध्यक्ष राजेश कोळवणकर, सचिव सुधीर कांबळे, खजिनदार रविंद्र संसारे तसेच सर्व संचालक, संस्थेचे सी. ई. ओ. रविन्द्र दरडी यांनी मुख्याध्यापक रुपाली संतोष सावंत देसाई व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल पाली, नाणीज पंचक्रोशीतुनही शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 07/Dec/2024

Khabardar diwali fest