राजापूर : रायपाटण बाजारवाडीमध्ये दत्त जन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रम

राजापूर : राजापूर तालुक्यातील रायपाटण, बाजारवाडीमधील श्री गुरुदत्त सेवा मंडळाच्यावतीने दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस साजरा होणाऱ्या या सोहळ्यात दत्त याग, दत्त जन्मोत्सव, भजन शौकिनांसाठी खास मेजवानी ठरणारा भजनाचा जंगी सामना, यासह लग्न होता होता.. हा नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे. यावर्षी ह.भ.प. ओंकार ज्ञानेश्वर कपलानी (पुणे) यांची कीर्तन सेवा सादर होणार आहे.

श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये गुरुवार १२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता मंदिरामध्ये दत्त नामाचा गजर होईल. शुक्रवार १३ डिसेंबरला सकाळी ९ . दत्तयाग, सायंकाळी ५ वा. कीर्तन सोहळा रात्री ८. ३० वा. आरती, प्रदक्षिणा आणि रात्री १० वा. भजनाचा जंगी सामना पार पडणार आहे. समस्त भजन शौकिनांसाठी खास मेजवानी असून भजनाच्या या डबलबारीमध्ये बुवा तेजस अनिल नारकर, बुवा प्रवीण सुतार यांच्यामध्ये हा भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.

शनिवार १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता दत्त जन्माचे कीर्तन, रात्री आठ वाजता आरती, प्रदक्षिणा कार्यक्रम पार पडतील. रविवार १५ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता लघु रुद्र, दुपारी एक वाजता महाप्रसाद, रात्री साडेआठ वाजता दिंडी आरती प्रदक्षिणा आणि रात्री साडेदहा वाजता लग्न होता होता… हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. सोमवार १६ डिसेंबरला सकाळी साडेसहा वाजता लळीताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होईल.

श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरुदत्त सेवा मंडळ, रायपाटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 09/Dec/2024