साहित्य वाचत नाही तोपर्यंत समाजदर्शन होणार नाही : लोकायुक्त अंबादास जोशी

रत्नागिरी : साहित्य समाजाच प्रतिबिंब असत. जोपर्यंत आपण साहित्य वाचत नाही तोपर्यंत समाजदर्शन होणार नाही, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती तथा गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांनी केले. अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयात ते बोलत होते. राज्यघटना जिवंत झऱ्यासारखी आहे तर कायदा, ग्रंथ मृत मिळकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वकीलांनी वाचनाची सवय लावून घेतली तर ताण दूर होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पुस्तकाचे लेखक अॅड. विलास पाटणे यांनी न्या. एच. आर. खन्ना यांनी एडीएम जबलपूर खटल्यात विरोधी मत नोंदविताना अपूर्व धैर्य दाखविले असे सांगून व्यक्तीच्या जगण्याचा अधिकार मोठा असतो असे सांगितले. लॉ कॉलेजची गुणवत्ता, वकीलांची विश्वासाहर्ता आणि न्यायाधीश यांची निःस्पृहता महत्त्वाची असल्याचे सांगतानाच यातूनच लोकशाही जिवंत राहील, असे सांगितले.

यावेळी अॅड. विलास पाटणे लिखित प्रतिमा आणि प्रतिभा पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांस वितरीत करण्यात आली.

कॉलेज चेअरमन अॅड. विनोद घायाळ यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्य डॉ. सोनाली बुरटे यांनी आभार मानले. अध्यक्षस्थानी अॅड. राजीव साबळे होते. सूत्रसंचालन प्रा. अदिती पाटनुस्कर यांनी केले. याप्रसंगी सरकारी वकिल तेंडुलकर, अॅड. मेहता, अॅड, ठाकूर उपस्थित होते.

Samarth gold

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 09/Dec/2024