खेड : सुकिवली औदुंबर देवस्थानतर्फे १३ डिसेंबराला महिलांचे स्नेहसंमेलन

खेड : सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थानच्या वतीने दत्त जन्मोत्सवानिमित्त १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी सकाळी ११ वाजता महिलांचे स्नेहसंमेलन कायदेतज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

श्रीदत्तात्रेयपारायण सोहळा, सायंकाळी ६ वाजता स्थानिक व कर्टेल येथील ग्रामस्थांचा हरिपाठ व नामस्मरणाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता अन्नदान होईल. १४ रोजी पहाटेपासून विधीवत पूजापाठ, महाआरती, घटस्थापना, विणापूजन, ध्वजारोहण आदी कार्यक्रमांसह तपपूर्ती सोहळा, श्रीगुरूचरित्र वज्रकवच पठण आदी अध्यात्मिक कार्यक्रमानंतर दुपारी अन्नदान होईल. सायंकाळी ५.०५ वाजता दत्तजन्म सोहळा होईल.

सायंकाळी ६ वाजता तळे व सुकिवली येथील ग्रामस्थांचा हरिपाठ, ७.३० वाजता जेष्ठ कीर्तनकार यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. रात्री ८.३० महिलांसाठी वाजता भाविक भक्तांना अन्नदान, १० वाजता हरिजागर, महिलांसाठी विविध स्पर्धा व स्थानिक भजन कार्यक्रम होईल. १५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता कीर्तनकार व भाविकांच्या उपस्थितीत काकड आरती होईल. या सोहळ्यात बहुसंख्य भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीकांत चाळके, स्वाती चाळके यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 10/Dec/2024

Tata motars punch