दापोली : आंजर्ले खाडी लवकरच घेणार मोकळा श्वास

दापोली : आंजर्ले खाडीतील गाळ उपसा करण्यासाठी खाडीत गाळप यंत्रणा दाखल झाली असून, लवकरच खाडी मोकळा श्वास घेणार आहे. बऱ्याच वर्षांपासूनची कोळी बांधवांची आंजर्ले खाडीचा गाळ काढण्याची मागणी आता पूर्णत्वास येणार आहे. कोळी बांधवांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण खाडी असल्याने मासेमारी बंदीच्या काळात याच खाडीत येथील कोळी बांधव आपल्या नौका नांगरून ठेवतात.

शिवाय आंजर्ले पंचक्रोशीतील अनेक नौका या खाडीत दररोज ये-जा करत असतात. मात्र आंजर्ले खाडीचे मुख गाळाने भरले असल्याने अनेक नौका या गाळात फसतात व त्यांचे नुकसान होते. असे अनेकदा झाले आहे. यामुळे आंजर्ले खाडीतील गाळ काढला जावा, अशी मागणी येथील कोळी बांधव मागील अनेक वर्षे करत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 12/Dec/2024

Tata altroz