संगमेश्वर : माखजन हायस्कूलमध्ये १९ डिसेंबरला आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे दि. १९ डिसेंबर रोजी, कै. पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षातर्फे जिल्हास्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण १७ स्पर्धक असणार आहेत. पहिली फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये लहान गटातून ८ तर मोठ्या गटातून ९ स्पर्धक निवडण्यात आले आहेत. लहान गटात निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये अर्णव सरपोतदार, मुक्ता बापट, दिया परब, वेदिका गांधी, मुक्ता आंबेकर, इरा गोखले, आराध्य राजपूत, मीरा खेडेकर आदींचा समावेश आहे तर मोठ्या गटात श्रुष्टी तांबे, ऐश्वर्या सावंत, कैवल्य मुसळे, शारदा पटवर्धन, सई नर, अक्षया लवंडे, प्रियल ऐवळे, गिरीराज लिंगायत आदींचा समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संगीत शिक्षक विशारद गुरव या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सायंकाळी ६.३० वा संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार असून, रसिकांना पाहण्यासाठी खुली असणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्था अध्यक्ष किशोर साठे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 12/Dec/2024

Ratnagiri Khabardar add image