राजापूर : हातिवले येथील ज्ञान मंदिरात शनिवारी दत्तजयंती उत्सव

राजापूर : आदिनाथ सांप्रदायिक अध्यात्म भक्तीज्ञान प्रसारक ॐ सिध्द सेवा समाज ज्ञान मंदिर हातिवले येथे शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सकाळी ७.३० ते ९.३० अभिषेक, पुजा, महाआरती ९.३० ते. ११ विचार मंथण, ११ ते १२.३० वाजता प. पू. सद्गुरु विश्वनाथ (भाई) गोसावी महाराज यांचे प्रवचन व श्री दत्त जन्म आख्यान. दुपारी १२.३० ते १ दत्तजन्म सोहळा, दु. १ ते ५ वाजता दर्शन, तिर्थप्रसाद, महाप्रसाद तर सायंकाळी ५.०० ते ६.०० स्वामींच्या महामंत्राचा जप, ६.० ते ८.०० पालखी उत्सव ढोलपथक कोंड्ये मधलीवाडी तर रात्री ८ नंतर भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

तरी सर्व भक्तगण साधक शिष्यगण व हितचिंतक मित्रमंडळी आणि बंधु भगिनी सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष मोहन कावळे, सेक्रेटरी रविंद्र बांधकर, संचालक प. पू. स. विश्वनाथ (भाई) गोसावी महाराज, जगन्नाथ गोसावी यानी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 12/Dec/2024

Amey jwelrs