दापोली : कोकण कृषी विद्यापीठात ५ रोजी महाशिबिर

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्देशानुसार विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दुर्बल घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे दि. ५ ऑक्टोबर रोजी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराच्या नियोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश निखिल गोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. जनतेला त्यांचे हक्क व अधिकार प्रत्यक्ष मिळावेत, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे महाशिबिर राबविण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 27/Sep/2024

Mahrashi karve ANM