राजापूर शहर परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

राजापूर : गेले काही दिवस राजापूर शहर परिसरात तसेच बाजारपेठ भागात बिबटयाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी राजापूर शहरातील नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी आमदार किरण सामंत याना लेखी निवेदन देवून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत या तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली.

या निवेदनाची तत्काळ दखल घेत आमदार किरण सामंत यांनी राजापूर वनपाल जयराम बावदाने यांना या बाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेले काही दिवस राजापूर शहर परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. हा बिबट्या शहरातील भटाळी, पंचायत समिती परिसर, बाजारपेठ या भागात फिरताना नागरिकांना दिसून आले आहे. रात्री ११.३० नंतर मंगळवारी भर बाजारपेठेत या बिबटयाचे दर्शन झाले. यामुळे नागरिक, व्यापारी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 14/Dec/2024