तो आलाय… वन्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी…रत्नागिरीत पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा

रत्नागिरी : कोकणच्या जैवविविधतेत भर घालणारी आणि वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव तळसर च्या जंगलात पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. याच सोबत या वाघाने केलेली शिकार देखील आढळून आली आहे. सर्वसाधारणपणे कोकणपट्ट्यात बिबट्याचा संचार आढळतो. मात्र आता कोकणातील जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास आढळल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.