मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे राजापूर येथे किरण सामंत यांनी केले स्वागत

रत्नागिरी : कणकवलीचे आमदार आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे रविवारी सकाळी राजापूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

राजापुरातील रानतळे परिसरामध्ये भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांची मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती.

राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी मंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजापूर तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनीसुद्धा व्यापारी संघटनेच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राजापूर भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, राजापूरचे माजी नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, भाजपा माजी नगरसेविका शीतल पटेल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अश्पाक हाजू, भाजपा शहर अध्यक्ष संदेश आंबेकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनायक दीक्षित, वसंत पाटील, राजा खानविलकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक दीनानाथ कोळवणकर, श्रुती ताम्हणकर, अविनाश महाजन, ननीलेश पाटणकर, विनायक कदम, जयंत कदम, सचिन धनवी, सुप्रेश घामत, अरविंद लांजेकर, कोंडसर भाजपाचे बाळ दाते, भाजपाचे पदाधिकारी पिंट्या गुरव, राजापूर अर्बन बँकेचे संचालक विवेक गादिकर, शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 23-12-2024