विद्यार्थीदशेतच राष्ट्रहिताचा विचार रुजावा : एअर मार्शल हेमंत भागवत

चिपळूण : राष्ट्राचा पाया माणसे घडविणे हा आहे आणि विद्यार्थी हा देश विकासाचा कणा आहे. व्यक्तिहिताबरोबर राष्ट्रहित महत्त्वाचे असते. विद्यार्थिदशेतच राष्ट्रहिताचा विचार रुजवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत एअर मार्शल हेमंत भागवत यांनी व्यक्त केले. डी.बी. जे. महाविद्यालयाच्या एन.एस.एस व एन. सी. सी. विभागाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक अनुराधा मेहेर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, नियामक समिती सदस्य सौ. सावित्री होमकळस, प्राचार्य डॉ माधव बापट, स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा. सुरेश नामदास आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ माधव बापट यांनी मनोगत व्यक्त केले. एन. एस. एस. व एन.सी.सी हे महाविद्यालयातील महत्त्वपूर्ण विभाग आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

एअर मार्शल हेमंत भागवत यांनी आपल्या मनोगतामध्ये आजचा विद्यार्थी हा योग्य काळात जन्माला आला आहे. अनेक संसाधने आपल्या हाताशी आहेत. देशाला विश्वगुरू बनवायचे असेल तर स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सार्‍या जगाचे नैतिक नेतृत्व भारताने करावे या सार्‍याचे जबाबदारी अर्थातच तरुण किंवा विद्यार्थ्यांच्यांवर आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Tata motars punch

या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार संजीव खरे, नियामक समिती सदस्य अविनाश जोशी, माधव टिकेकर, नयनिश गुडेकर, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे, डॉ चेतन आठवले, उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच कुमार हर्षद बेंडके एन. सी. सी. विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. के. एस . सावरे व प्रा. सौ. जयंती काटदरे यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी एन. एस. एस. विभाग कुमार पार्थ खेडेकर यांनी केले.
पाठपुराव्यानंतर वन विभागाच्या श्री. गुरव यांनी कॅमेरे आणून बसवले आहेत. यावेळी राजापूर शहरातील शैबाज खलिफे, याकूब कुडाळकर, रेहान मुजावर, मुईन इसब, वईद याहू, रेहान झापडेकर, अलियान झापडेकर, युसूफ खोपेकर, रुहेज खलिफे आदी उपस्थित होते. या प्रश्नाबाबत अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या पुढाकारासाठी नागरिकांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 23-12-2024