दापोलीचा कायापालट करणार : राज्यमंत्री योगेश कदम

दापोली : येत्या अडीच वर्षात दापोली विधानसभा क्षेत्राचा सर्व घटकांचा कायापालट करणार आहे. येथे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून राज्याला हेवा वाटेल, असा दापोली विधानसभा मतदारसंघ घडवणार असल्याचे आश्वासनदेखील नवनिर्वाचित राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

दापोली विधानसभा क्षेत्राचे आमदार व नवनिर्वाचित राज्यमंत्री योगेश कदम यांचा दापोलीतील राधाकृष्ण मंदिरात सोमवार दि. २३ रोजी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. आमदार योगेश कदम हे राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच दापोलीत आले होते. दापोलीतील विविध सामाजिक संस्था, महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व शिवसेना यांच्यावतीने हा सत्कार झाला. कदम यांनी श्री काळकाई देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, मारुती मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. यानंतर काळकाई कोंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजारपेठ मार्गे राधाकृष्ण मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. राधाकृष्ण मंदिरात ना. योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 24/Dec/2024