रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिले देहदान झाले आहे.
रत्नागिरीत राहणारे दिगंबर साठे (वय ६५) यांचे दीड वाजण्याच्या सुमारास उपचारांदरम्यान शासकीय रुग्णालयात निधन झाले.
त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची पत्नी स्नेहल साठे व मुलगी छाया साठे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोग व्हावा या इच्छेने कै. साठे यांचे देहदान केले. दिगंबर साठे यांच्या पत्नी स्नेहल साठे आणि कन्या छाया साठे यांनी गेल्या १८ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महविद्यालयात येऊन देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार देहदानाची प्रक्रिया पार पडली.
शरीररचना शास्त्र विभागामध्ये आलेल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण तसेच संशोधन यासाठी केला जातो. या संपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिक अली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व विभागातील कर्मचारी यांचा सहभाग होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचेदेखील सहकार्य मिळाले. अधिष्ठाता डॉ. रामानंद व डॉ. सय्यद यांनी देहदान संकल्प करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 24-12-2024












