रत्नागिरी : दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्ध महिला जखमी

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्ध महिला जखमी झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लिलावती अनंत करवडे (वय ७०, रा. तळेकांटे, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे.

ही घटना गुरुवार २६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास कुवारबाव येथील समता हॉटेल समोर रस्त्यावर घडली. वृद्ध महिला लिलावती या सकाळी कुवारबाव-समता हॉटेल येथे रस्ता ओलांडत असताना दुचाकीची धडक बसली. अपघात घडताच दुचाकी स्वाराने वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अशी नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 27/Dec/2024