रत्नागिरी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये यांचे आताच काही वेळापूर्वी रत्नागिरी लोटलीकर हॉस्पिटल येथे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे इतके होते.
आपल्या कार्यकाळात कुमार शेट्ये यांनी पंचायत समिती सभापती पद भूषवले होते. त्यांनी राष्ट्रवादी चे माजी जिल्हाध्यक्ष पद देखील भूषवले होते. शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे, विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांची त्यांनी कधीही साथ सोडली नव्हती. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.
कुमार शेट्ये यांच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. शिरगाव येथे आज सायंकाळी ७ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 27-12-2024












