सह्याद्री कला महाविद्यालयाच्या विशाल गोवळकरची कलाकृती राज्यात सर्वप्रथम

रत्नागिरी : कला संचालनालयाने आयोजित केलेल्या राज्य कला प्रदर्शनात चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयातील विशाल गोवळकरची कलाकृती सर्वश्रेष्ठ ठरली आहे.

या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे ही खूप मोठी व अभिमानाची बाब समजली जाते. यावर्षी घेण्यात आलेल्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कला महाविद्यालयातील विभागातून २५ विद्यार्थ्यांच्या ३० कलाकृतींची निवड झाली आहे. या निवडलेल्या कलाकृतींमधून शिल्पकला विभागातून विशाल गोवळकर याला राज्यातून प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर, विशाल मसणे यांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.

यावर्षीचे ६४वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन नागपूरला होणार आहे.

निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे अशी :

मूलभूत अभ्यासक्रम – मिथिल अंगचेकर, विराज पाचाडकर, ज्योती पांचाळ, साहिल परुळेकर, आदित्य सावरटकर, अभिषेक जावळे. कला शिक्षक पदविका प्रथम वर्ष – तन्वी गोरीवले, धनंजय नलावडे, ऋतिक इनामदार, सोनल घाणेकर. कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष – प्रतीक गांजेकर, स्वरूप पवार.

रेखा व रंगकाला विभाग – तुळशी भुवड, सुजल निवाते, शुभम घोरपडे. शिल्प व प्रतिमानबंध कला – प्रथमेश गोंधळी, सार्थक आदवडे, भूषण थवी,चैतन्य मांडवकर, रुचित सांगळे, विशाल गोवळकर, ऋषिकेश पड्याळ, सोहम धामणस्कर, अध्वज चव्हाण, विशाल मसणे. या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कला प्रदर्शनात झळकणार आहेत.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व चिपळूणचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 30-12-2024