Ratnagiri : स्मार्ट सिटी योजनेतून पानवल धरणाची दुरुस्ती

रत्नागिरी : रत्नागिरी शहराची स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवड झाल्यानंतर विविध विकासकामांना सुरुवात झाली असून, रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी २० कोटींहून अधिकचा निधी एमआयडीसीने दिला असून, पाटबंधारे विभागाकडून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या दुरुस्तीमुळे ०.३४१ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होणार असून, जादा पाण्याची गरज भागणार आहे.

रत्नागिरी शहराला सध्या पानवल धरण आणि शीळ धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणातील पाणी ग्रॅव्हीटीच्या साहाय्याने शहरात आणले जाते. या धरणाचे बांधकाम १९६२ मध्ये करण्यात आले आहे. धरणाला सध्या ६२ वर्षे पूर्ण झाली असून, मोडकळीस आले आहे. पूर्णतः मोडकळीस आले आहे. यामुळे पुरेसा पाणीसाठा गेले काही वर्षे होत नाही. यातच मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. पानवल धरण हे दगड बांधकाम करून बांधण्यात आलेले आहे. सांडव्याचे आणि सहभिंतीचे दगडही पडलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात असते. त्यामुळे या धरणाचे दगडी सांडल्यास सिमेंट ग्राऊटिंग, दोन्ही बाजूला संधानकात अस्तरीकरण करणे, स्टिलिंग बेसिनची नव्याने उभारणी करणे, विमोचनाकडे जाण्याकरीता पोच रस्ता करणे यासह विविध कामांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी योजनेमधून या धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्ञाती कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. यासाठी २०.६९ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पाटबंधारे विभागामार्फत याच्या दुरुस्तीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गळती थांबणार असून जवळपास ०.३४१ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

नवीन पाईपलाईनही
या धरणातून पाणी ग्रॅव्हीटीने शहरात येत असल्याने विजेच्या बिलाची मोठी बचत होत असते. त्यामुळे नवीन पाईपलाईनही टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पानवल धरणातून येणारे पाणी शुध्द करण्यासाठी नाचणे येथील सुपलवाडी परिसरात जुने जलशुध्दीकरण केंद्र पाडून नवे केंद्र उभारण्यात आले आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ना. उदय सामंतांचे प्राधान्य
रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या परिसरात पाणीटंचाई आणवू नये, यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष लक्ष आहे. शीळ धरणाची नवीन कलेल, पानवल धरण दुरुस्तीसह बाव नदीवर २४ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. जयगड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी कळझोंडी धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. ना. सामंत यांनी नागरिकांना पाणी प्रश्न नये म्हणून विशेष प्राधान्य दिले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 30/Dec/2024