गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंद जयंती निमित्त साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सोमवार ते गुरुवार दुपारी २ ते ५ या वेळेत, वेळणेश्वर भक्तनिवास येथे वर्ग घेतले जाणार आहेत. वेळणेश्वर परिसरातील सर्व गावांमधून पाच महिला बचतगटाच्या एकूण २५ महिलांना प्रवेश दिला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 01/Jan/2025













