१२ तासाच्या आत केले जबरी चोरीतील संशयिताना अटक; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

रत्नागिरी : २०२४ वर्षाच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरीत घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली. ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोनच्या सुमारास एमआयडीसी येथे राहणाऱ्या कल्पना भिसे यांच्या घरात घुसून पाच ते सहा महिलांनी चोरी केली होती. या घटनेचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झाले होते. चोरट्या महिलांनी घरातील दागिने लंपास केले होते. याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस स्थानकात देताच पोलिसांच्या टीम चोरट्या महिलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाल्या.

विविध ठिकाणाची सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आली. अखेर या चोरट्या महिलांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. ग्रामीण पोलिसांनी जलद गतीने तपासाची सूत्र फिरवून १२ तासाच्या आत संशयित आरोपी महिलांना गोवा येथून अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 01-01-2025