स्वच्छतेसाठी १७ व्यावसायिकांचे प्रबोधन

रत्नागिरी : सण, उत्सवावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी येणारे खाद्यपदार्थ दर्जेदार यावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईबरोबरच प्रबोधनावर भर दिला आहे. त्यासाठी रानागिरी जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसाय, हॉटेल, बेकरी उद्योजकांना नोटीस देऊन स्वच्छतेसाठीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच स्वच्छता नसलेल्या जिल्ह्यातील १७ व्यावसायिकांवर कारवाईही केली. त्यांना सुधारण्यासाठी संधीही दिली. त्यामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलेल्या चार व्यावसायिकांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाकडून सण उत्सवाच्या अगोदर एक महिना हॉटेलमधील नोकरवर्गाता स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात येते तसेच कार्यालयाकडून पदार्थ व पाण्याची तपासणी केली जाते. पावसाळा सुरू असल्याने ठिकठिकाणाहून पाणी येत असते. ते स्वच्छ आहे की, नाही याची काळजी घेतली जात नाही. पावसाळ्यात पाण्यामुळे आजर होतात, प्रशासनाकडून छोटया व्यावसायिकांवर (टपरी) खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरही अन्नसुरक्षा विभागाकडून कारवाई केली जाते. अस्वच्छता आढळल्यास त्यांना सूचना दिली जाते.

जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने ५ हजार, रत्नागिरी जिल्ह्यात परवानाधारक हॉटेल,आणि रेस्टॉरंट १४०० असून नोंदणीकृत दुकानांची संख्या सुमारे ३५०० ते ४००० इतकी आहे. या सर्व व्यावसायिकांकडे कार्यालयाकडून भेट दिली जाते. तेथील स्वच्छता प्रबोधन करण्यात येते. जिल्ह्यात १७ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली, त्यातील चारजणांचे परवाने काही अवधीसाठी निलंबित करण्यात आले. मात्र, सुधारणेची पूर्तता झाल्यानंतर त्यांचे परवाने पूर्ववत करण्यात आले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

नवीन वर्षात हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छतेचे पालन करावे, व्यवसाय वृद्धिंगतेकडे वाटचाल करावी, तसेच व्यावसायिकांसह जिल्ह्यातील नागरिकांनी शिळे अन्न अथवा फ्रीजमधील चार दिवसांपूर्वीच अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे तसेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्यांचा वापर गृहिणींनी वेळेवर करावा. दीनानाथ शिंदे, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन, रत्नागिरी

JMBR

नमुने तपासण्यासाठी मुंबईत
अन्न व औषध प्रशासनाकडून प्रत्यक्ष तपासणी करणे आणि नमुने गोळा करणे ही कामे केली जातात. प्रत्येक अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नऊ तालुक्यात विभागणी केली आहे. बाजारात विकले जाणारे खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांची नियमित तपासणी होते. त्याचा ऑनलाईन अहवाल सादर केला जातो, त्यात दोषी आढळल्यास कारवाई होते. सणासुदीला खाद्यपदार्थांच्या दुकानात नमुने तपासणी केली जाते. त्या वेळी घेतलेले नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवले जातात. नियमांचे उल्लंघन केल्यास खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दिवाळीत प्रशासनाकडून तपासणीवेळी बेसन, रवा, तेल आणि मिठाई यांचे नमुने घेण्यात येतात. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 02/Jan/2025