खेडमध्ये श्रमदानातून बांधले ८२ बंधारे

खेड : जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेल्या कच्चे बंधारे बांधण्याच्या मोहिमेंतर्गत तालुक्यात श्रमदानातून आतापर्यंत ८२ बंधारे बांधण्यात आले आहेत.

६१ कच्चे बंधाऱ्यांसह २ वनराई व १९ विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांमुळे पाण्याच्या बचतीसह उपयुक्त कामासाठी पाण्याचा वापर करता येणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमार्फत पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबवत ग्रामपंचायतींना बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले जाते. ग्रामपंचायती ग्रामस्थांच्या श्रमदानातून विजय बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेत असल्याने आतापर्यंत ८२ बंधारे पूर्ण झाले आहेत. या बंधाऱ्यांमुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 02-01-2025