देवरुख : शिल्पा मुंगळे यांना अनुश्रुती पुरस्कार प्रदान

देवरुख : शहरातील ललित बाला अॅकॅडमीच्या प्राचार्या व कथ्थक विशारद शिल्पा मुंगळे यांना काठमांडू येथे उत्कृष्ट डान्स फरफॉर्मरसाठीचा अनुश्रुती पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल नटराजम सांस्कृतिक संघ मेंबर ऑफ इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस फ्रान्स प्रेझेंट एशियन डान्स समिट इंटरनॅशनल डान्स चॅम्पियन्स फेस्टिव्हल काठमांडू येथे नुकताच झाला. या फेस्टिव्हलमध्ये शिल्पा मुंगळे (भिडे) यांना फेस्टिवल मधील उत्कृष्ट डान्स परफॉर्मर म्हणून अनुश्रूती पुरस्कार कथ्थकचे महागुरू पंडित श्री राजेंद्र गंगाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 03/Jan/2025