रत्नागिरी : उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी येथे सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात रत्नागिरीतील जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौरभ मलुष्टे यांचा मंगळवार १ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील १ ऑक्टोबर रोजी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार १ ऑक्टोबर रोजी सौरभ मलुष्टे मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुनील बेंडखळे, दिनेश जठार, योगेश विरकर, राजा बामणे, स्वप्नील दळी, अभिषेक सुर्वे, अविनाश भोसले आणि सुरेंद्र लाड यांच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात अधिकाधिक रत्नागिरीतील नागरिकांनी रक्तदान करून सहभाग दाखवावा, असे आवाहन सुनील बेंडखळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9028478344 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 30-09-2024