रत्नागिरी : शहराजवळील काळबादेवी गावात रस्त्यावर पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. विकास कृष्णा मयेकर (वय ६२, रा. काळबादेवी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
ही घटना २९ डिसेंबरला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास मयेकर यांनी मद्य प्राशन केल्याने ते रस्त्यावर पडले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 04-01-2025














