‘स्वप्न पडल्याचे मी बोललोच नाही!’; स्वप्नात मृतदेह दिसणाऱ्या ‘त्या’ तरुणाचा घुमजाव

खेड : भोस्ते घाटात आढळलेल्या संगाडयाने पोलिसांना गरागरा फिरवले आहे. या प्रकरणात आता नवनवीन ट्विस्ट आला आहे. ज्या तरुणाने आपल्या स्वप्नात मृतदेह दिसतो तो मदतीची याचना करत आहे असे सांगितले त्या योगेश आर्या (30, रा. आजगाव सावंतवाडी, सिंधुदुर्ग) याने आता घुमजाव केले आहे. तो मी नव्हेच ची भूमिका घेत ‘स्वप्न पडल्याचे मी बोललोच नाही, मी तर स्वतःच तिथे गेलो, असे सांगितल्याने पोलिसही चक्रावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अजून कायम आहे. डीएनए चाचणी अहवालानंतर नेमक्या कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

भोस्ते घाटात एका झाडाखाली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. काही अंतरावर कवटीही सापडली. हा मृतदेह तीन महिन्यापूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तवत मानवी सांगाडा मिरज-सांगली येथे पाठवण्यात आला आहे. त्या आधारे मानवी देह तयार करण्यात येणार असून त्याद्वारे मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे.

चौकशीसाठी ताब्यात घेतलेला योगेश आर्या याची स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकानेही रत्नागिरी येथे कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने सतत विसंगत उत्तरे दिल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले होते. मात्र आता तो आपल्याला स्वप्नात मृतदेह आल्याबाबत स्वप्नच पडले नसल्याचे सांगत आपण स्वतःहून घटनास्थळी गेल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे आता पोलीस कोणता संगाड्याचे गूढ उकळण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात हे पाहावं लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 30-09-2024