जनशताब्दी, मंगळूरसह तेजस धावणार ठाणे, दादरपर्यंतच

खेड : सीएसएमटी-मुंबई फलाट विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. फलाट क्रमांक १२ आणि १३ची पायाभूत कामे केली जात आहेत. आहेत. या कामांमुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेससह मंगळूर एक्सप्रेस आणि तेजस एक्स्प्रेस ३१ जानेवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे व दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.

याचा फटका कोकणातील प्रवाशांना बसणार आहे.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी, तेजससह मंगळूर एक्स्प्रेस कोकणवासियांच्या दृष्टीने महत्वाच्या गाड्या आहेत. या तीनही गाड्यांना कोकणवासियांची पसंती मिळते. सर्वाधिक सीएसएमटी येथे गेल्या काही

महिन्यांपासून फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे पुन्हा एकदा कोकणातील जनशताब्दी, मंगळूर एक्स्प्रेस व तेजस एक्स्प्रेस ३१ जानेवारीपर्यंत ठाणे व दादरपर्यंतच धावणार आहे आहेत. मुंबई मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास ३१ जानेवारीपर्यंत ठाणे स्थानकातच संपेल. २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेससह १२०५२ क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी जनशताद्वी एक्स्प्रेसदादर स्थानकापर्यंतच धावणार आहे.

Shiva optical

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 06-01-2025