मार्लेश्वर मध्ये विवाहाची जोरदार तयारी

साडवली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मार्लेश्वराचा यात्रोत्सव जवळ आला असून, आतापासूनच सह्याद्रीला यात्रेचे आणि मार्लेश्वराला विवाहाचे वेध लागले आहेत. श्री क्षेत्र मार्लेश्वर देवाचा यात्रोत्सव १३ व १४ जानेवारी साजरा होणार होत आहे.

मकर संक्रांतीला पारंपरिक पद्धतीने मार्लेश्वर देवाचा विवाह होणार आहे. या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आदल्या दिवशी सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल होणार आहेत, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. श्रीदेव मार्लेश्वर आणि कोंडगावची गिरजादेवी यांच्या विवाह सोहळ्यास विशेष महत्त्व असते. यास कल्याण विधी असे म्हणतात. सनई-चौघड्याच्या सुरात पारंपरिक वातावरणात शिवशंभोचा गजर करीत विवाह सोहळा होणार आहे.

मानपान, विडे भरणे, मुलगी दाखविणे, पसंती, हळद लावणे, आंतरपाट, मंगलाष्टके यासारखे धार्मिक विधी होणार आहेत. मार्लेश्वराचे मूळ आंगवलीच्या मंदिरात असल्याने तिथेही आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात येत आहे. या सोहळ्याची मंदिरात जोरदार तयारी सुरू असून, मानकरीही कामात मग्न आहेत. दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होणार असून, त्यासाठी तात्पुरते मंडप घालण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, सध्या मार्लेश्वर नगरीत विवाहाचे वारे वाहू लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 06/Jan/2025

Happy journey english