“वुमेन्स कार्निव्हल” मध्ये खरेदी करा आणि रोज जिंका २० हजारांची रिअल डायमंड रिंग

➡️ रत्नागिरी : जानेवारी महिन्यातील ९ ते १२ तारखेला कोकणातील सर्वात मोठे व्यवसायिक प्रदर्शन “वुमेन्स कार्निव्हल २०२५” रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड येथे होत आहे. सकाळी १० ते रात्रौ १० या वेळात आपण सहकुटुंब या भव्य व्यवसायिक प्रदर्शनाला भेट देऊ शकता.

कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी खबरदारच्या वतीने या कार्निव्हलचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी खऱ्या हिऱ्यांच्या, सोन्याच्या दागिन्यांपासून, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, गृहोपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू, पेंटीग, आकर्षक झाडे आदी अनेक वस्तू विक्रीस असतात. या कार्निव्हल मध्ये येऊन ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी रोज भाग्यवान ग्राहकांना हजारो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

यामध्ये पहिले बक्षीस २० हजार रुपयांची रिअल डायमंड रिंग असणार आहे. हि रिंग किस्ना डायमंड ज्वेलरी आणि रत्नागिरी खबरदार कडून प्रायोजित करण्यात आली आहे. तसेच आणखी ९ बक्षिसे दिली जाणार आहेत, ती खालीलप्रमाणे.

१) रोज पाच आकर्षक पाच बक्षिसे : एस एस मोबाईल कडून
२) आकर्षक एक बक्षीस : राघव एंटरप्राइझ कडून
३) आकर्षक बक्षीस : मोनाज हँडमेड प्रोडक्ट कडून
४) ५००० रु. किमतीचा मेकअप बॉक्स : जी के कॉस्मेटिक कडून
५) आकर्षक बक्षीस : पोऊचेस अँड मोअर कडून

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 07-01-2025