देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तालुक्यातील तुळसणी येथील रसिक कासम बोट याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रसिक याला सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रसिक हा २४ वर्षीय तरुण असून पीडित अल्पवयीन मुलीला गेली दीड वर्षे मानसिक त्रास देत होता. या बाबत देवरुख पोलिस ठाण्यामध्ये या घटनेतील अल्पवयीन मुलीनेच त्याच्याविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली. यानुसार देवरुख पोलिसांनी रसिकला तत्काळ ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी एकत्र येऊन पीडित मुलीला पाठिंबा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 07/Jan/2025














