रत्नागिरी : गद्रे कंपनीच्या कर्मचाऱ्यालाच त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या नावे पाच महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा मेसेज केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑगस्ट २०२४ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत गद्रे मरीन कंपनीमध्ये घडली आहे.
या प्रकरणी सचिन प्रभाकर हिरवे (४३, रा. सुबोध नगर जे. के. फाईल्सजवळ, रत्नागिरी) यांनी रविवार ५ जानेवारी रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी सचिन हिरवे हे गद्रे मरिन कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने ३० ऑगस्ट २०२४ आणि २ जानेवारी रोजी ग्रदे मरिन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जुन दीपक ग्रदे यांच्या नावाचा तसेच फोटोचा गैरवापर करत मेसेज पाठवले होते. या अज्ञाताने अर्जुन गद्रे यांच्या नावाचा तसेच फोटोचा गैरवापर करत त्यांच्या लौकिकाला बाधा आणून त्याचे दोन्ही नंबर हे कोणत्यातरी प्रयोजनाकरता वापरले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 07/Jan/2025














