रत्नागिरी : पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या १३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे. यंदा जवळपास साडेनऊ हजार शाळांची नोंदणी केली जाणार असून, एक लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात ९० शाळांनी नोंदणी केली असून ७७२ जागा असणार आहेत.
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते. संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीद्वारे देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली.

नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली. सध्या आरटीई पोर्टलवर दिसून येत असलेल्या आकडेवारीनुसार ८ हजार ३१६ शाळांची नोंद झाली असून, १ लाख १ हजार ४७४ जागा उपलब्ध झाल्या आहेत.
परंतु, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे शाळांची नोंदणी पोर्टलवर बाकी असून, येत्या दोन दिवसांमध्ये साडेनऊ हजार शाळांची नोंदणी पोर्टलवर दिसून येईल तसेच रिक्त जागांचीही वाढ होणार यंदादेखील प्रवेशासाठी ९० शाळांची नोंदणी झाली असून, ७७२ जागा उपलब्ध झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 07/Jan/2025














