दापोली : पुणे विद्यापीठाशी संलग्न अमृतेश्वर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न एन. के. वराडकर कला आणि आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय यांच्यातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी आणि संस्थात्मक क्षमता वाढवण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारी सुरू होत आहे, अशी माहिती वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य भारत कहऱ्हाड यांनी दिली.
सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक उत्कृष्टता प्रोत्साहन देणे, उत्तम पद्धतींचा आदान-प्रदान करणे, संसाधने आणि तज्ञतेचा वापर करणे आहे. दोन्ही संस्थांकडून शिक्षण, मूल्यांकन आणि संशोधनातील नावीन्यपूर्ण पद्धतींचा आदान-प्रदान, फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या अदलाबदलीचे कार्यक्रम आणि गुणवत्ता सुधारणा संबंधित कार्यशाळा, सेमिनार तसेच स्पर्धांचे आयोजन केले जाईल. याशिवाय दस्तऐवजीकरण आणि अभिप्रायासाठी टेम्पलेट्स आणि पद्धतींचाही आदान- प्रदान केला जाईल.
या सामंजस्य कराराचा कालावधी तीन वर्षे निश्चित करण्यात आला आहे. अमृतेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव एस. लाटे यांच्या वतीने डॉ. सुरेश मुलुक व डॉ. राहुल कांबळे आणि प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड, डॉ. गणेश बाजीराव मांगडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार दोन्ही महाविद्यालयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास धनंजय यादव आणि कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 07/Jan/2025














