खेड : घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय व सेंटर फार डिस्टसन अॅण्ड ऑनलाईन एज्युकेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.
सदर कार्यकाळेमध्ये कोणत्याही कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होवू शकतात. या कार्यशाळेमध्ये भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावरती सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चेत डॉ. शिवाजी सरगर, संचालक, सेंटर फॉर डिस्टसन्स अॅण्ड ऑनलाईन एज्युकेशन, प्रा. मंदार भानुसे, प्राध्यापक, सीडीओई, मुंबई विद्यापीठ, डॉ. जितेंद्र होले, डीन, आर. एन्. डी, शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 07/Jan/2025














