संगमेश्वर : मासरंग येथे साकव कामाचे भूमिपूजन

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील मासरंग, वरचीवाडी येथील ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीचा विचार करत साकवाच्या (कॉजवे) कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच झाला. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आ. शेखर निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करताना आमदार शेखर निकम यांनी या साकवासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून हे काम मंजूर करून घेतले. ज्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी आणि ग्रामस्थांना येणाऱ्या समस्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांचे आभार मानले. या साकवामुळे दळणवळण सुलभ होणार असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 07/Jan/2025