चिपळूण : आगामी नगरपालिका निवडणूक पावसाळ्याच्या आधी चिपळूण शहरातील महत्त्वाकांक्षी ग्रॅव्हीटी पाणी योजना तातडीने मार्गी लागावी, यासाठी पालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या योजनेंतर्गत खेड व डीबीजे महाविद्यालयाजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन साठवण टाक्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. मे अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे मार्गी लावून पुढील टप्प्यात उर्वरित पाईपलाईन कोळकेवाडी धरणातून पाणी उचलण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

तालुक्यातील कोळ्केवाडी धरणाच्या १११.५० उंचीवर असलेल्या आऊटलेटमधून चिपळूण शहरासाठी थेट पाणी उचलले जाणार आहे. तेथून १६ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनद्वारे खेर्डी येथील १०६ मीटर उंचीवर असलेल्या नियोजित साठवण टाकीत हे पाणी आणले जाणार आहे. पुढे डीबीजे महाविद्यालय (६८.६० मीटर उंचीवर पाग (७६.६७ मोटर उंची), गुहागर बायपास (५६.३० मीटर उंची) गोवळकोट येथील ५६.३० मीटर उंचीवर असलेल्या साठवण टाकीत एकाच वेळी ग्रॅव्हीटीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. या साठवण टाक्यांमधून शहरातील सहा विभागांत पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराच्या प्रत्येक भागात पाच ते सहा मजल्यांवर ग्रॅव्हीटी योजनेतील पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे, कोळकेवाडी धरणापासून शहरात ७०० मिलिमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. तेथून पुढे ४०० व ३५० मिलिमीटर असणार आहे. खेर्डी येथील डोंगरमाध्यावर असलेल्या १०० गुंठे नियोजित जागेत ११.५ लाख लीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खेडी येथे आधीच्या ७.५ लाख लीटर क्षमतेच्या साठवण टाकी सोबत ११.५ लाख लीटरची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे. याच पद्धतीने डीबीजे महाविद्यालय येथे ५.५६ लाख लीटर व गोवळकोट येथे ३.७५ लाख लीटर क्षमतेची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त पाग येथील ४ लाख लीटर गुहागर बायपास येथील ८ लाख लीटर व गोवळकोट येथील ७ लाख लिटरच्या जुन्या साठवण टाक्यांचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत पाईपलाईनसह साठवण टाक्यादेखील नव्याने उभारल्या जाणार आहेत.
डीबीजे व खेंड साँ मिलच्या परिसरात नवीन साठवण टाकीचे काम सुरू आहे. त्याशिवाय अन्य साठवण टाक्यांच्या दुरुस्तीचे कामही तातडीने मार्गी लावून पाईपलाईन जोडणी सुरू केली जाईल, त्याचबरोबर जलसंपदा विभागावर कोळकेवाडी धरणापासून पेढांबेपर्यंत जलवाहिनी टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात याही कामाला गती दिली जाणार आहे. रोहित खाडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, चिपळूण नगरपालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 08/Jan/2025












