एनसीडीच्या माध्यमातून प्रभावी नीलक्रांती : डॉ. प्रकाश शिंगारे

रत्नागिरी : मत्स्य शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेचे बळकटीकरण आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे यांनी केले.

लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अॅकॅडमी फोर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन.सी.डी.सी. पुणे, सहकार मंत्रालय, मत्स्यव्यवसाय विभाग आणि मत्स्य महाविद्यालय यांच्यावतीने संस्थेच्या परिषद दालनात मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेला प्र. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय डॉ. प्रकाश शिंगारे, प्रोफेसर ऑणि हेड फिशरीज कॉलेज डॉ. नितीन सावंत, डॉ. केतन चौधरी, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण उपस्थित होते.

मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावयाचे, यासंदर्भात सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

केंद्राच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील मच्छीमार हा खोल समुद्रातील मासेमारी करण्यास १२ ते २०० समुद्र मैलांपर्यंत मासेमारीकरिता जाऊ शकतो, अशी माहिती दिली. ड्रोनचा आधार घेऊन बेकायदेशीर मासेमारी टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मत्स्य शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य शेतकऱ्यांनी करावा. – आनंद पालव, प्र. सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 08/Jan/2025