वुमेन्स कार्निव्हल २०२५ चे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

◼️ ९ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलंय कोकणातील भव्य व्यवसायिक प्रदर्शन

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे व्यवसायिक प्रदर्शन म्हणून ओळख असणाऱ्या वुमेन्स कार्निव्हल २०२५ चा शुभारंभ आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. ९ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान हे प्रदर्शन रत्नागिरी शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे.

खऱ्या हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांपासून कपडे, साड्या, इमिटेशन ज्वेलरी, आकर्षक शोभेच्या वस्तूंची भरपूर व्हरायटी या वुमेन्स कार्निव्हल मध्ये आहे. भविष्यात हे कार्निव्हल महाराष्ट्रातील सर्वात मोठे कार्निव्हल म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी शिवसेना प्रमुख बिपीन बंदरकर, शिवसेना शहर संघटक सौरभ मलुष्टे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, किस्ना डायमंड ज्वेलरी चे अमेय वीरकर, एस एस मोबाईलचे अमोल डोंगरे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरीतील सर्व महिलांनी मोठ्या संखेने सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन रत्नागिरी खबरदार चे संपादक हेमंत वणजु यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 09-01-2025