रत्नागिरी : सोमेश्वर शांतिपिठाच्या विश्वमंगल गोशाळेच्या कार्यकर्त्यांनी कणेरी मठ येथील श्री काडसिद्धेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी श्री काडसिद्धेश्वर स्वामींनी गोशाळा चालवण्यासंदर्भातील मार्गदर्शन केले. स्वामींनी पावसाळ्यामध्ये गोशाळेला भेट देण्याचे मान्य केले. गोशाळेमधील कार्याला माझा आशीर्वाद आहे, असे स्वामी म्हणाले.
सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेच्या कार्यकर्त्यांनी कोकणनगर येथे सुरू असलेल्या कणेरी मठ काडसिद्धेश्वर महाराजांचे प्रवचन कार्यक्रमात भेट घेतली. या भेटीदरम्यान सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळा सुरू आहे. या गोशाळेत रत्नागिरी परिसरातील भटक्या गायींचे संगोपन करण्याचे कार्य सुरू आहे. या कामाबद्दल माहिती दिली. श्री काडसिद्धेश्वर स्वामींनी गोशाळा चालवण्यासंदर्भातील मार्गदर्शन केले.
गायींना सांभाळताना कोणती काळजी घ्यावी, गोमाता राजमाता या अर्थाने समाजामध्ये गायींनबद्दलची ममता कशी वाढवावी, या विषयी स्वामींनी आपले विचार कथन केले.
याप्रसंगी सोमेश्वर शांतिपिठाचे अध्यक्ष राजेश आयरे, कार्यकत सुरेश दाते, विनायक हातखंबकर, विनोद पेटकर, अनुजा पेटकर आदी उपस्थित होते. उपस्थित भक्तगणांनाही त्यांनी गोशाळेला जोडून घ्या, असे आवाहन केल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 10/Jan/2025













