रत्नागिरी : झाडीत मद्य पिणाऱ्यांवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई-कुरतडे ते तोणदे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजूच्या झाडीत मद्य पिणाऱ्या वृद्धाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराम रत्न शिंदे (वय ६५) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ९) सायंकाळी सहाच्या सुमारास तोणदे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजूच्या झाडीत निदर्शनास आली. याप्रकरणी पोलिस शिपाई राजेंद्र वळवी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 11/Jan/2025