संगमेश्वर : भवानगडावर सोमवारी भवानीदेवीचा जत्रोत्सव

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील चिखली-राजवाडी सीमेवर असलेल्या भवानगड येथील भवानीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी (ता. १३) होणार आहे. भवानगड येथे वार्षिक जत्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळी १० वा. देवीची विधिवत पूजा, दुपारी १२ वा. महाआरती, २ वाजता संगीत भजन, संध्या. ४ वाजता स्वागत व रात्री दहा वाजता देवीचा गोंधळ होणार आहे. भवानगड हा टेहेळणी गड आहे. येथे भवानीदेवीचे मंदिर तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. मंदिरात शिवकालीन इशारा तोफसुद्धा पाहावयास मिळते. मंदिराच्या पायथ्याच्या दोन्ही बाजूला थंडगार पाण्याचे झरे असून शिवलिंगही आहे. जत्रेसाठी बाहेरून येणारे भाविक संगमेश्वर रेल्वे स्टेशनला उतरून रिक्षाने पुढे येऊ शकतात. तसेच संगमेश्वर बसस्थानकावरून कडवई, चिखली येथे येणाऱ्या बसने पुढे येता येते. तिथून पायी अथवा रिक्षाने जाता येते. सर्व भाविकांनी या यात्रोत्सवाला यावे, असे आवाहन भवानगड ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 11/Jan/2025