संगमेश्वर : पाटगाव घाटीतील रखडलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत बांधकाम विभागाला निवेदन

संगमेश्वर : देवरूख रत्नागिरी मार्गाचे रुंदीकरण दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे देवरूख ते बावनदी (तळेकाटे) हा प्रवास सुकर झाला आहे; परंतु देवरूखपासून जवळच असणाऱ्या पाटगाव घाटीतील सुमारे ५०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण न करता तो तशाच अवस्थेत सोडून देण्यात आला. या अरुंद रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तिथे झालेल्या अपघातात आतापर्यंत दोघांना जीवहीं गमवावा लागला आहे.

देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटीतील त्या धोकादायक ठिकाणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून त्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी देवरूखवासीयांनी केली आहे. याबाबत संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेत आमदार शेखर निकम यांनी संबंधित विभागाला पाटगाव येथील विषयावर गांभीयनि लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या; परंतु याबाबत कोणतीही हालचाल न करता सार्वजनिक बांधकाम फक्त बघ्याची भूमिका येत आहेत त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याच मार्गावरील सुमारे १० गावांतील ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, त्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. २६ जानेवारीपर्यंत यास्त्याबदल ठोस निर्णय न झाल्यास प्रजासत्ताक दिनी १० गावांतील ग्रामस्थ, बांधकाम विभागातील ग्रामस्थ उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना वैभव सुर्वे, संतोष जाधव, तेजस शिंदे, विनोद माने, समीर चाळके, बावा चाळके, परिमल चाळके, बाबू पेडणेकर, राजा पेडणेकर, रवी चाळके, प्रतीक चाळके, संमेश चाळके, सचिन सावंत, नागेश चाळके यांच्यासह दहा गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 13/Jan/2025

Baguass