राजापूर : कोळंबमधील रेशीम शेती प्रकल्पाला फॅशन डिझाईंनच्या विद्यार्थिनींची भेट

पावस : राजापूर तालुक्यातील कोळंब गावचे प्रगतशील शेतकरी बळीराजा पुरस्कार सन्मानित राजाराम पाटेकर यांच्या रेशीम शेती प्रकल्पाला लांजा येथील कल्पना कॉलेजच्या फॅशन डिझाईनच्या विद्यार्थिनीनी भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.

श्री. पाटेकर यांनी रेशीम शेती कोणत्या उद्देशाने करण्यात आली, त्याची भविष्यामध्ये कोणते फायदे होतील याबाबत माहिती देताना ग्रामीण भागांमध्ये या शेतीच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा निर्माण होईल, या विषयी माहिती दिली.

यावेळी कॉलेजचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, प्राध्यापिका धनश्री बंडबे / अफझा वनू या विद्यार्थिनीसोबत उपस्थित होत्या. त्या वेळी रेशीम उद्योग किवा रेशीम कीडे याचे उत्पादन कसे तयार होते, याची माहिती देताना विभागातील प्रगतशील शेतकरी अमर खामकर, हनुमंत विचारे, राजाराम पाटेकर यांनी कोकणामध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेशीम शेती यशस्वी करून पुढे व्यावसायिक तत्त्वावर राजापूर. लांजा रेशीम शेतकरी समूहाचे कार्य चालू आहे. रेशीम शेतीची माहिती कोकणातील तरुणवर्गातील मुलांपर्यंत पोचली पाहिजे, यासाठी गट प्रयत्न करत आहे, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 13/Jan/2025