खेड : मूळगावमधील गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

खेड : तालुक्यातील खाडीपट्टयातील मूळगाव येथील गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी छापा टाकून १ हजार ५०० रुपये किमतीचा पिवळसर रंगाचा प्लास्टिकचा कॅन, १ हजार ५०० रुपये किमतीची १५ लिटरचे गावठी हातभट्टीच्या दारूचे रसायन, दहा रुपये किमतीचा प्लास्टिकचा ग्लास असा ३ हजार १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपीत सुनील सोनू जागडे (वय ३९, रा. कर्जी, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रकाश पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 15/Jan/2025

Amey jwelrs