रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहर अध्यक्ष पदी सुस्मिता सुर्वे

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी शहर अध्यक्ष पदी धडाडीच्या कार्यकर्त्या सुस्मिता सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात समाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या सुस्मिता सुर्वे यांची निवड करून मनसेने महिला आघाडीत एक डॅशिंग चेहरा दिला आहे.

पद नियुक्ती वर बोलताना सुस्मिता सुर्वे यांनी सांगितले की रत्नागिरी शहरात महिलां करिता मनसे मार्फत काम करण्यासाठी जी संधी मिळाली आहे ती मी पुरेपूर पार पाडेन आणी रत्नागिरी शहरात महिलांकरिता भरीव कामं करेन. यां सोबत सौ. संपदा महेंद्र सिंह राणा यांची महिला शहर सचिव तर सौ. बिस्मिल्ला मेहबुब नदाफ महिला शहर संघटक पदी निवड कारण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीने येणाऱ्या आठवड्यात संपूर्ण शहरात इतर नेमाणुका करून महिला आघाडी सक्षम पणे कार्यरत कारण्याचा मानस बोलून दाखवाला. यां प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामागार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, शहर सचिव प्रभात सुर्वे, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम इत्यादी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 17/Jan/2025