रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाने थोर चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या लेख स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
स्पर्धेत प्राची राव (देवरूख) संतोष दरेकर (चिपळूण), मंजूश्री भागवत (देवरूख) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. ऐश्वर्या शिंदे (लांजा) आणि प्रतीक जाधव (दापोली) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. पद्मभूषण चरित्रकार डॉ. धनंजय कीर, व्यक्तिमत्त्व विकासात ग्रंथालयाचे महत्त्व आणि राष्ट्राच्या विकासात महाराष्ट्राचे स्थान हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.
विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५०० आणि १००० हजार रुपयांचा धनादेश तसेच प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण ४६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण अंजली बर्वे, सुनेत्रा जोशी आणि उमा जोशी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, उपाध्यक्ष संभाजी सावंत, प्रमुख कार्यवाह महेंद्र दळवी, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी यशस्वी स्पर्धकांचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 17-01-2025














