रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळेसही भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ची सफर घडविली जाणार आहे. त्यासाठी मुलाखत प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील ५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला यशही येत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळांची मुले अव्वल ठरत आहेत. विशेषतः शिष्यवृत्ती, नवोदयच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांचा टक्का वाढता आहे. याच अनुषंगाने ‘इस्त्रो’ आणि नासा भेटींचा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘इस्त्रो’ आणि नासा या दोन्ही अंतराळ संशोधन संस्था आहेत. ‘इस्त्रो’ म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था तर नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस डमिनिस्ट्रेशन, ‘इस्त्रो’ मुख्यालय बंगळूर येथे आहे तर नासा अमेरिकेत आहे.
‘इस्त्रो’ आणि नासाच्या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यासाठी केंद्रस्तरावर चाचणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतून निवडक विद्यार्थ्यांना ‘इस्त्रो’ आणि नासाच्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळते. ‘इस्त्रो’ आणि नासाच्या अंतराळ संशोधन संस्थांच्या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना या संस्थांच्या कामगिरीची माहिती मिळते, मंडणगड तालुक्यातील सहा, दापोली तालुक्यातील सात, खेड तालुक्यातील सहा, गुहागर तालुक्यातील सात, चिपळूण तालुक्यातील सहा, संगमेश्वर तालुक्यातील सात, रत्नागिरी तालुक्यातील सहा, लांजा तालुक्यातील पाच तर राजापूर तालुक्यातील सहा जणांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमधून शास्त्रज्ञ घडवण्याचा हेतू…
भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये शास्वत निर्माण करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘इस्रो’ व ‘नासा’ हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतला आहे. यासाठी चाचणी परीक्षा घेतली जाते आणि यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 17/Jan/2025














